धर्म Poem by dhirajkumar taksande

धर्म

Rating: 5.0

वाहीलेे होते कधी मी,
जे पोथीत राहीलेले.
वाचले होते कधी मी,
नव्हते जे पाहिलेले.
भुक अशी मानवाची,
कमी मज चंद्र तारे.
आरश्याने दाविले खरे,
कालचे धर्म व्यर्थ सारे.
माणसा आणले तु,
सृष्टीला मृत्यूद्वारे.
कळले पुन्हा नव्याने,
कर्म कालचे व्यर्थ सारे!
*******************************
धर्म तुझा दिसतो; तुझ्या ह्या कर्मातून,
ठेव लाज धर्माची; तुझ्या ह्या कर्मातून.

तु दाखवित जा आरसा, आचरणाला
दाव साज धर्माचा; तुझ्या ह्या कर्मातून.

समन देत जा तु; तुझ्या ह्या माथ्याला
ने जहाज धर्माचे; तुझ्या ह्या कर्मातून.

निर्माता तु सृष्टीच्या ह्या स्वर्गाचा
सांग राज धर्माचे; तुझ्या ह्या कर्मातून.

Sunday, September 7, 2014
Topic(s) of this poem: religion
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success