विपस्यना Poem by dhirajkumar taksande

विपस्यना

Rating: 5.0

बुद्धाच्या तेजोमय किरणात न्हाऊ
लाभल्या इन्द्रियाने धम्मज्ञान घेऊ
आपल्या यथाभूत स्वरुपाला पाहू
मानवाला सुखाचा मंगलपथ दाऊ

श्वास असा सोडून श्वास असा घेऊ
कायेतल्या संवेदना जागृतिने पाहू
ही आहे काया जाणून घेऊ
कायानुपश्यी होऊन कायेत राहू

सुखद दुःखद संवेदना प्रज्ञापूर्वक अनुभवू
निरामिष सामिष संवेदना पाहु
हि आहे संवेदना सत्यात पाहू
वेदनानुपश्यी होवून वेदनेत राहू

रागलोभ चित्तातले काळजीने पाहू
द्वेषदुषित द्वेषरहित चित्त आज जाणु
हे आहे चित्त स्मृती स्थापून घेऊ
चित्तानुपश्यी होवून चित्तात राहू

कामवासना आणि द्रोहभावना पाहू
शंका संदेह आणि उद्वेग खेद जाणु
आळसाचा विनाश करून धम्म हा पाहू
धम्मानुपश्यी होऊन धम्मात राहू

शारिरीक मानसिक आजारमुक्त होऊ
मानवाच्या शुध्दिचा शोध आज घेऊ
चित्तच्या शुद्धीतून निर्वाणपथ जाणु
आनापान विपस्यनेचे ज्ञान जगा देऊ

Sunday, September 7, 2014
Topic(s) of this poem: meditation
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success