द इंचकेप रॉक Poem by Sameer Khasnis

द इंचकेप रॉक

मंद वारा, संथ धारा
जणू ते जहाज उभं कसं
जसं परमपित्याचा नियम जणू काही
सांगाडा उभा धीर समुद्रावर

न चाहूल ना, ध्वनि धारा वाहता
झुळझुळ, नाही त्यांना उसळली, नाही त्यांना उभार
पाषाणावरून वाहे तो अथांग सागर धीरमनी
सहृदयी तो अब्बोट ऑफ अबरब्रोथोक चार

स्वयम् बांधली ही घंटा, उभी त्या पाषाणावरी
हेलकावे घेत जेव्हा येई वादळ वारे,
कधी इकडे, कधी तिकडे हेलकावे घेई वादळा संगे
देई नाविकास हाक सावधतेची

लहरी लाट करी गलबलाट, उसळता
मिटे अस्तित्व इंचकेप पाषाणाचे
मात्र तो ध्वनि, आणे मनी करी घंटानाद सावध नाविकास

नाविकास जोडे हात, देई मनापासून सहृदयी तो अब्बोट ऑफ अबरब्रोथोक ला आभाराची साद
तो भिषण पाषाण दडुन बसला समुद्राखाली

आज तो तेजस्वी सूर्य, शिंपडीत सोनेरी किरणे
जगी सर्व आनंद, मनी स्वानंद, आहे वेळ हा दिवस सरणे
समुद्र पक्ष्यांचे थवेच्या थवे,
आनंदीत उडे, सांगत हे हवे, ते हवे

हिरवागार समुद्रमाथा
दिसे त्यावर काळा ठिपका उंच तो आता
बेफिकिरी भटक्या तो सर राल्फ
चालत बघे हा अखंड त्या काळ्याभोर ठिपक्यावरी

मनी उसळे आनंदाचा झरा भराभरा
ओठावर शिळं, मन अधिर ना सुधीर
राल्फ तो आनंद, त्याचा पाइरेट्स वेष सोबत घुणा आणि मत्सर द्वेष,

डोळ्यात साठवून राग, बोले तैसा
' हा जाऊन करितो त्या पाषाणावरील त्या घंटेची राख
सोडा हो ह्या पाण्यावर होडी, ही करतो मी खोडी
छाटुन टाकतो ही घंटा, मिटेल हा तंटा, बांधली अबरब्रोथोक नी

जमली हो माणस, सोडली दोरी लांब,
केली कुच पाषाणास, सर राल्फ वाकिला थोडा,
म्हणे ती घंटी इथं ओढा, घाली चांगल्या कामी हा खोडा
कापली ती घंटा, वाईटच काम करी हा बंदा

सरर गेली हो घंटी, क्षणात समुद्र तळी
उठले काही बुडबुडे, ह्या घंटे विना हा समुद्र उणे
म्हणे तो सर राल्फ' आता ना कोणी जोडील हात, ना घालील तो अबरब्रोथोक ला साद

उनाड जो सर राल्फ, होऊन लाटांवर स्वार
लुटली जहाजे ती जी करी व्यापार, साठवली माया अपार
सुकाणु फिरवत पुन्हा धरली वाट परतीची
तिरी स्कॉटलंड फिरी

मावळा हा दिवस जरी, तरी दिसला नाही रवी
आभाळी साचला घुर, धुक्याचा आज महापुर
वादळ वारं दिवस प्रहर, सांज आज शांत करि कहर
आली समीप तीन प्रहर

उभा राल्फ होडीवर
अंधार हा बाका, धीराने होडी हाका
काही नाही दिसत जरी
चंद्र आहे क्षितीजावरी, प्रकाश त्याचा मंद जरी
वाट दावील आपणास घरी

बोले एक नाविक' का आलो आहे आपण कोण्या बेटा सरशी, ना ऐकू येई लाटांची खळखळ, आपटणाऱ्या जलाची तडफड
आता असती जर का ती घंटा, नसती भरली ही मुत्यु घटका

शांतता भयाण मात्र, लाटा उसळे करीत सगळ्या गलीतगात्र
लाटांचा उसळला मेरू, ना कुठे वारा, ना कुठे गेरू
हेलकावे खात चाले होडी, निसर्गाने चांगलीच मोडली राल्फ ची खोडी
अखेर घडकली हो राल्फ ची होडी, एका क्षणात समुद्र फोडी
सुरू झाली त्यांची सफर तळाशी, नाव घेई अखेर येशुचे ओठांशी

स्वतः ला देत शिव्या शाप
ओढत केश टराटरा, होडीत शिरले पाणी भराभर
तळ दिसे सरळ, मुत्यु आता अटळ
सर राल्फ पाहे उघड्या डोळा, मुत्युचा हा अजब सोहळा
तळाशी ती इंचकेप घंटा किणकिणत
जणू यमलोकीची वाट खुणवीत


मुळ कवी: रॉबर्ट सोऊथे
रुपांतर: समीर खासनीस

द इंचकेप रॉक
POET'S NOTES ABOUT THE POEM
Robert Southey was a poet Laureate of England who is famous for his poetic work including The Battle of Blenheim. This is a very beautiful poem in a ballad form.
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success