जगाचा पोशिंदा Poem by dhirajkumar taksande

जगाचा पोशिंदा

Rating: 5.0

शेतीच्या तासातासात जिंदगी मी पेरली
माझ्या घामातुन त्यांची गोदामं भरली
हुंकाराची रव माझी हवेतच विरली
व्यवस्थेन निर्धनांची सुखी स्वप्न चोरली
जगाच्या पोशिंद्यावर गिधाड येवुन ठेपली
कर्जमुक्तीच्या धनादेशावर चिता माझी पेटली

बाई मी पोळी ग पोळी मी चारतो
जिवाची होळी ग होळी मी जाळतो
नभ भरलं ग भरलं
नाही टिपुसभर गरलं
डोयी आसु ग
आसु मी ढाळतो
जिवाची होळी ग होळी मी जाळतो
शेत विणलं ग विणलं
मन माझ ग शिणलं
रोज तणकट
तणकट मी सारतो
जिवाची होळी ग होळी मी जाळतो
जिणं पेरल ग पेरल
हातामधी न काही उरलं
त्यांची खळी ग
खळी ग मी भरतो
जिवाची होळी ग होळी मी जाळतो
रक्त आटलं ग आटलं
झाडा पाणी नाही भेटलं
उभा जीव ग
जीव हा वाळतो
जिवाची होळी ग होळी मी जाळतो
शासन गरलं ग गरलं
सारं सपन माझ जळलं
माझ सरण ग
सरण माळतो
जिवाची होळी ग होळी मी जाळतो
चाक उलटं ग उलटं
कधी नशिब होइल सुलटं
माझ मरण ग
मरण चाळतो
जिवाची होळी ग होळी मी जाळतो

Wednesday, September 3, 2014
Topic(s) of this poem: farm
COMMENTS OF THE POEM
Dr. Ravipal Bharshankar 05 September 2014

You are right. Government should pay a serious attention towards the development of agriculture and farmers. You have really written a nice piece of poem! Awaiting more good poems from you..! !

0 0 Reply
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success